Ad will apear here
Next
‘अवयवदान हे महान कार्य’
अवयवदातांचे कुटुंबीय व अवयव दानप्रक्रियेमध्ये सहभागी होणार्‍या व्यक्तींचा सत्कार करताना डॉ.कपिल झिरपे, वैद्यकीय सेवेचे संचालक डॉ.संजय पठारे, अभिनेता अतुल परचुरे, पुण्याच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त अशोक मोराळे आणि रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अ

पुणे : ‘​​जिवंतपणे चांगले काम करू शकलो नाही, तरी मरताना किती मोठे कार्य करण्याची शक्यता असते हे अवयवदानामुळे सिद्ध होते’,​​ असे मत प्रसिध्द अभिनेते अतुल परचुरे यांनी व्यक्त केले. अवयवदान हे सक्तीचे करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रूबी हॉल क्लिनिकतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘ऑर्गन डोनर डे’चे औचित्य साधून अवयवदातांचे कुटुंबीय व अवयव दानप्रक्रियेमध्ये सहभागी होणार्‍या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे, रिबर्थ, लायन्स क्लब्स इंटरनॅशनल व होप अँड केअर फाउंडेशन यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

रूबी हॉल क्लिनिकतर्फे ‘ऑर्गन डोनर डे’चे औचित्य साधून अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शनिवारवाडा ते बालगंधर्वदरम्यान काढण्यात आलेल्या अम्ब्रेला रॅलीत सहभागी नागरिक.या वेळी अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शनिवारवाडा ते बालगंधर्व रंगमंदिरदरम्यान अम्ब्रेला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता अतुल परचुरे, पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त अशोक मोराळे यांसह ‘रूबी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट, वैद्यकीय सेवेचे संचालक डॉ. संजय पठारे, डॉ. कपिल झिरपे, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. अभय सदरे, डॉ. अभय हुपरीकर, डॉ. शीतल धडफळे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा जोशी, सिध्दार्थ गांधी, लायन चंद्रहास शेट्टी, पद्मा अय्यर, श्रध्दा गणेरीवाला, राधा खांदोडे, सक्षम जेष्ठत्व, बंडोपंथ फडके, डॉ.सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

परचुरे म्हणाले की, ‘अवयवदानाबद्दल मलाही पूर्ण ज्ञान नव्हते. आज या कार्यक्रमाला आल्यानंतर मला याचे महत्त्व कळले. परदेशात अवयवदानाचे प्रमाण हे जास्त असून, त्या तुलनेत भारतातील प्रमाण अत्यल्प आहे, अशी माहिती येथे उपस्थित डॉक्टरांकडून मिळाली. अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आपण स्वत: प्रचार व प्रसार करणार असून, प्रत्येकाने या कार्यात सहभागी व्हावे.’ या वेळी परचुरे यांनी स्वत: अवयवदानाचा फॉर्म भरला.

मोराळे म्हणाले, ‘अवयवदानाच्या प्रक्रियेत ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून आमचा सहभाग असतो व या महान कार्यामध्ये आमचा हातभार आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. बर्‍याच वेळा आम्ही भावनिक प्रसंग अगदी जवळून पाहतो; पण या भावनिक प्रसंगातून बाहेर पडून जे महान कार्य अवयवदात्यांचे कुटुंबीय करतात ते खरोखरच महान आहेत. पुणे विमानतळ ते ‘रूबी हॉल’ दरम्यान तयार करण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरमध्ये मी ही सहभागी होतो. आतापर्यंत प्रत्येक वेळेस हे अंतर साधारण सहा मिनिटांत पार केले गेले आहे. जेव्हा आम्ही ग्रीन कॉरिडॉरबाबत लोकांना सांगतो तेव्हा ते अक्षरश: त्यांच्या जागेवर थांबतात आणि आपला हातभार लावतात. गेल्या १० महिन्यांत २२ ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले व ते पूर्णपणे यशस्वी झाले या प्रक्रियेत आमचा सहभाग आहे, याचा आम्हाला आनंद आहे.’

प्रेरणा चंदनशिवे या हदयप्रत्यारोपण झालेल्या मुलीने नृत्य सादर केले; तसेच रविकांत ठोके, मिलिंद रहाळकर, शार्दुल सावंत, अथर्व देशपांडे या अनुक्रमे हदय, यकृत, मुत्रपिंड, कॉर्निया प्रत्यारोपण झालेल्या रूग्णांनी मनोगत व्यक्त केले; तसेच नीलेश गायकवाड या अवयवदान केलेल्या युवकाचा भाऊ विकास गायकवाड याने आपले मनोगत व्यक्त केले. नीलेश गायकवाड यांचे हात ही दान करण्यात आले होते, हे महाराष्ट्रात प्रथमच घडले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZRNBN
Similar Posts
‘रुबी हॉल’तर्फे विद्यार्थी, कर्मचार्‍यांचा सत्कार पुणे : दहावी व बारावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या कर्मचार्‍यांच्या मुला-मुलींचा रुबी हॉल क्लिनिकतर्फे सत्कार करण्यात आला. या अंतर्गत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात २३ विद्यार्थ्यांना कै. डॉ. के. बी. ग्रांट मेरिटोरियस अ‍ॅवॉर्डने गौरविण्यात आले; तसेच शिक्षणात पुन:प्रवेश करत पदवी अभ्यासक्रमासाठी
‘रुबी’तर्फे जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त जनजागृती पुणे : ‘जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त (वर्ल्ड नो टोबॅको डे) ३१ मे रोजी रूबी हॉल क्लिनिकतर्फे जनजागृतीसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत,’ अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय पठारे, कर्करोग तज्ञ डॉ. भूषण झाडे आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती ठाणेकर यांनी दिली.
‘रुबी’तर्फे वर्षभरात १३ हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पुणे : रक्तसंचयामुळे हृदय निकामी होण्यातून (कन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर) अनेकांचे आयुष्य बाधित होते. शस्त्रक्रियात्मक आणि जीवनशैली उपचारांतील आधुनिक औषधांमुळे त्यांना आनंदी आयुष्य जगता येते; पण काही लोकांबाबत मात्र परिस्थिती तीव्र खालावते. त्यावेळी ते अशा टप्प्यावर पोचतात जेथे हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय उरतो
‘रुबी’तर्फे एनडीएमध्ये व्हर्च्युअल क्लिनिक सुरू पुणे : रुबी हॉल क्लिनिकतर्फे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) कॅंपसमधील बिगर लष्करी अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबियांसाठी व्हर्च्युअल क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनिकच्या माध्यमातून या परिसरातील दहा हजारांहून अधिक रहिवाशांना सामान्य, सर्वसाधारण आजारांचे निदान तसेच, हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ञांद्वारे सल्ला देण्यात येणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language